कर्जत शहरातील विकास कामांना वेग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संत श्री गोदड महाराज गल्ली हि शहरातील मॉडेल गल्ली करून शहर विकासात देखणे काम उभे करणार असल्याची माहिती कर्जत नगर पंचायतीचे नगराध्यक्ष नामदेवराव राउत यांनी दिली. श्री गोदड महाराज यात्रेपूर्वी या गल्लीत सुरु असलेले काम पूर्ण करण्यात येणार असून नजर लागेल असे काम या ठिकाणी सूरु आहे. कर्जत येथील संत श्री गोदड महाराज गल्लीतील समाधी मंदिर असलेल्या गल्लीला कर्जत शहरामध्ये विशेष महत्व असून शहराच्या विकासात या गल्लीच्या विकासापासून सुरुवात करण्यात आली आहे. 

जलसंधारण मंत्री व पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे याच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत श्री गोदड महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण करण्यासाठी पाउने दोन कोटीच्या मिळालेल्या निधीतून श्री गोदड महाराज गल्लीमध्ये सर्वत्र पेव्हिग ब्लॉक बसवले जाणार आहेत. मात्र त्या अगोदर वीज, टेलिफोन, नळकनेक्शन, गटार अशा विविध सेवा अंडरग्राउंड केल्या जाणार असून त्याचे विविध पाईप वायर टाकण्याचे काम सध्या वेगात सुरु आहे. 

या गल्लीत आकर्षक स्ट्रीटलाईट टाकली जाणार असून सध्या सुरु असलेल्या कोन्क्रेटीकरणानंतर त्यावर आकर्षक पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत. यासाठी विमानतळाची धावपट्टी बनवताना जे केमिकल वापरले जाते ते उच्च दर्जाचे साहित्य वापरले जाणार आहे. कर्जत शहरातील अत्यंत महत्व असलेल्या श्री गोदड महाराज गल्लीचा विकास शहरातील मॉडेल गल्ली म्हणून होत असून राउत यांनी माहिती देताना म्हटले कि आगामी २० जुलै रोजी कर्जत येथे रथ यात्रा असून श्री गोदड महाराज गल्लीतील काम हे शहरातील सर्वात उत्तम काम असेल व हि गल्ली मॉडेल गल्ली म्हणून ओळखली जाईल.

शहराच्या होणार्या विकासात सर्वच विभाग पदाधिकारी व ग्रामस्थ सहकार्य करत असून यानिमित्त त्यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, कोन्त्राक्त्रर देवा खरात विजय घालमे, अनिल काकडे, आदीसह गल्लीतील अनेक नागरिक उपस्थित होते. सदरील कामात कोठे चढ राहिला कोणत्या बाजूने पाईप टाकायचा, कोणाला नळ कनेक्शन घ्यायचे आहे अशा बारीकसारीक बाबीवर नगराध्यक्ष राउत हे स्वत: जातीने लक्ष ठेऊन आहेत. 

दि २० जुलै रोजी महाराजाचा रथोत्सव आहे. रथोत्सव जवळ आला असून त्या अगोदर काम पूर्ण केले जाणार आहे. श्री गोदड महाराज गल्लीतील सर्व रहिवाशांनी अगोदरच रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या घरासमोरील दुकानासमोरील ओटे, दोन मजली, तीन मजली गॅलरी स्वत:च्या खर्चाने काढून घेतले आहेत. त्यामुळे गल्ली अत्यंत सुंदर दिसत असून. याठिकाणी सध्या रस्ता कोन्क्रेटीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

त्यावर रथ यात्रेच्या अगोदर पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत. नगराध्यक्ष नामदेवराव राउत यांनी ६४४ कोटी रुपयाचा कर्जत शहर विकास आराखडा शासनाकडे नुकताच सादर केलेला आहे. आगामी काळात कर्जत शहर एक विकसित शहर म्हणून पुढे येणार असून दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याला ना. राम शिंदे यांनी कुकडीचे पाणी विनासायास मिळवून दिल्याने तो प्रश्न हि निकाली निघाला आहे. त्यामुळे शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतो आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.