पुन्हा कर्जत तालुक्यात बेवारस मृतदेह सापडला.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा ते टाकळी खंडेश्वरी या मार्गावर रस्त्याचे कडेला आज एका अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडल्याने पुन्हा एकदा तालुक्यात खळबळ माजली असून कर्जत तालुक्यात हे नेमके काय घडते आहे असा प्रश्न जो तो विचारू लागला आहे. 

कर्जत तालुक्यातील बाभूळगाव टाकळी या रस्त्यावर उताराला एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आज सकाळी 9 वाजता बाभूळगावचे पोलीस पाटील महामुनी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनला दिली. बनियन व अंडरपॅन्ट एवढेच कपडे असलेल्या या मृतदेहावर कोणत्याही जखमा नसून कपाळी छोटासा बुक्का लावलेला आहे.

अद्यापी हा इसम कोण आहे याची ओळख पटलेली नसून याबाबतची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक पालवे पो. हे.पोलीसानी घटनास्थळी जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. uउपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक वसंत भोये, पोलीस uउप निरीक्षक शहादेव पालवे यांचे सह पोलिसानी घटनास्थळी भेट दिली याठिकाणी कोणत्याही प्रकारची इतर वस्तू अथवा पुरावा पोलिसांना आढळून आलेला नाही. 

सदर घटनेबाबत पोलीस नाईक कासार यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून मयताचा कोठेतरी गळा दाबून अज्ञात वाहनाने या ठिकाणी आणून निर्जन स्थळी टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी वा ओळख पटू नये यासाठी मयताच्या अंगावर कोणताही आरोपीने कपडा ठेवलेला नाही. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहेत. 

या मृतदेहाची कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. आठ दिवसापूर्वीच कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे एक महिला व दोन मुलाचा अंगावर अॅसिड टाकून खून केल्याची व हे मृतदेह जंगलात बेवारस सापडल्याची घटना ताजी असताना व अद्यापि या घटनेतील मयत व खुनी नेमके कोण आहेत याचा कुठलाही तपास पोलिसांना लागलेला नसताना पुन्हा एकदा तालुक्यात बेवारस अनोळखी प्रेत आढळण्याची घटना समोर आल्याने पोलीसासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

सध्या पंढरीची वारी करून भाविक आपल्या घरी परतत आहेत. सोलापूर नगर या रस्ताबरून मोठ्या संखेने भाविक परतत असताना कपाळी बुक्का असलेला हा इसम या भाविकापैकी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जत तालुक्यात खून करून मृतदेह बेवारस टाकण्याच्या या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र हि व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला जात आहे. 

कर्जत तालुक्यातील गेली एक वर्षात गुन्हेगारी घटनानी कळस गाठला आहे. तालुक्यात एक वर्षापूर्वी देशाला हादरवणारी विदारक अशी कोपर्डीची घटना घडली होती त्यानंतर भांबोरा येथील घटनेने तालुका पुन्हा ढवळून निघाला होता काही काळानंतर पाटेवाडी, बाभूळगावखालसा, खंडाळा अशा एका मागे एक अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या त्याची धग कुठे शांत होते न होते तर आत्म्हत्याचे सत्र तालुक्याने पाहिले होते. 

आता त्यातून थोडी सुटका मिळू लागली असतानाच तालुक्यात बेवारस मृतदेह सापडण्याचे सत्र सुरु झाले कि काय असा संशय व्यक्त केला जाऊ लागला असून दुर्गावच्या घटनेनंतर या घटनेमुळे पोलिसांची निश्चितच जबाबदारी वाढली आहे. अशा घटनामध्ये पोलीस काही करू शकत नसले तरी तालुक्यांत असलेला पोलिसाचा धाक नक्कीच कमी झाला कि काय असे वाटू लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.