कुकडी प्रकल्पाच्या ६ हजार सिमेंट गोण्या गायब.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्‍यातील कुळधरण येथील कुकडी वसाहत येथून 13 लाख 23 हजार रुपये किमतीच्या तब्बल 6 हजार 300 सिमेंट गोण्या चोरीस गेल्या आहेत. कुकडीच्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी या गोण्यांचा वापर होणार होता. विशेष म्हणजे चोरीची ही घटना ऑक्‍टोबर 2015 मधील आहे. तब्बल दोन वर्षांनंतर ठेकेदाराने पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद नोंदविली आहे. पोलीसही फिर्याद ऐकून चक्रावून गेले आहेत.

                           


ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd

कुकडी प्रकल्पाची कर्जत तसेच कुळधरण येथे वसाहत आहे. 2014 मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर यांनी येथील वसाहती करमाळा (जि. सोलापूर) येथे हलविल्या. कुकडी डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी कुळधरण येथील कुकडी कार्यालयाशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या बिर्ला व एसीसी सिमेंटच्या तब्बल 6 हजार 300 सिमेंटच्या गोण्या (प्रत्येकी 50 किलो वजन) 12 ऑक्‍टोबर ते 9 डिसेंबर 2015च्या दरम्यान अज्ञातांनी चोरून नेल्या. गोण्यांची त्या वेळची खरेदी किंमत 210 रुपये होती. या गोण्यांची किंमत 13 लाख रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इडमकंटी वेंकटरामी रेड्डी (वय 53, रा. वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे) या ठेकेदारानेच फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या गोण्यांचा विमादेखील उतरविण्यात आलेला होता. गोण्यांच्या चोरीचा तपास कुकडी प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू होता. मात्र, अखेर फिर्याद देण्याचा निर्णय घेण्यात आला. फिर्याद देण्यास एवढा उशीर का झाला हे मात्र समजू शकले नाही.

कर्जत पोलीस ठाण्यात कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शेख हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.