कोपर्डी येथील घटनेस होतेय उद्या एक वर्ष पूर्ण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृणपणे खून केल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने गुरुवार दि १३ रोजी कोपर्डी येथे पीडित मुलीस श्रध्दांजली वाहण्यात येणार असून मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच समाजातील विविध प्रश्न व भविष्यातील वाटचालीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. 


कोपर्डी १३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी बरोबर १ वर्षा पूर्वी कोपर्डी येथे अमानुष अत्याचार व हत्येची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्रातील व देशातील सर्वजण हादरून गेले होते. समाजामध्ये या घटनेने मोठा असंतोष पसरला होता. यातूनच आत्याचारीत अल्पवयीन मुलगी शेतकरी कुटुंबातील मराठा समाजाची असल्याने या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटने विरुद्ध देश व देशा बाहेर ही मराठा क्रांती मोर्चातून कोट्यावधी लोक कोपर्डीतील घृणास्पद कृत्याचा निषेध करत मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले. 

शांततेत व आदर्श आचार संहिता पाळून लाखो युवक, महिला, मुले, वृद्ध यांच्या सहभागातून निघालेल्या ५७ मोर्चांनी एक वेगळा इतिहास रचला. या मोर्चा मधून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, अत्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा विविध मागण्या करण्यात आल्या. कोपर्डी घटनेला १३ जुलै ला एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र आजूनही या घटनेचा खटला निकाली निघून आरोपींना शासन झालेले नाही तसेच मराठा समाजाने मोर्चाद्वारे केलेल्या न्याय मागण्याबाबत हि कुठलीही ठोस कार्यवाही न होता मागण्याची हेळसांडच करण्यात आली. 

यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चाच्या झालेल्या बैठ्कामध्ये दि १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता भैरवनाथ भक्त निवास या ठिकाणी श्रद्धाजली व मराठा क्रांती आढावा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून दि ९ ऑगष्ट रोजी मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय मराठा क्रांती महा मूकमोर्चाची तयारी व पुढील दिशा याबाबत विचारविनियम करून महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती लालासाहेब सुद्रिक यांनी दिली. याच दिवशी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून सूर्योदय परिवाराचे वतीने राष्ट्रसंत भय्यूजी महाराज याचे प्रबोधन होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.