शहरातील शाळा होतायेत डिजिटल जयहिंद युवा मंचचा पुढाकार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जयहिंद युवा मंचच्यावतीने फकीरवाडा येथील जिल्हा परिषद शाळेस डिजिटल क्लास रूम साहित्य भेट देण्यात आले असून सिद्धार्थनगरमधील पंचशील विद्या मंदिर या प्राथमिक शाळेला डिजिटल क्लास रूम साहित्य भेट देण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

सध्याच्या डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. डिजिटल माध्यमाद्वारे ग्रामीण शिक्षण पद्धतीचा विकास होऊ घातला आहे, म्हणून नगर शहरात देखील दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जयहिंदने पुढाकार घेतला आहे.

 जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना देखील इतर खाजगी शाळांप्रमाणेच आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता जयहिंद युवा मंचने शहरातील प्राथमिक शाळांना डिजिटल करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहे. त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून फकीरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उर्दू शाळेला डिजिटल क्लास रूम देण्यात आले व आता सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेस देखील डिजिटल क्लास रूम देणार असल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.