डॉ.प्रकाश कांकरिया यांची ७५ लाखांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याकडून जमिनीवरील आरक्षण उठवण्यासाठी आणि ताबा देण्यासाठी ७५ लाख रुपये घेवून सदर जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जमिन स्वत:च्या मालकीची भासवल्याप्रकरणी मुंबई येथील पिता-पुत्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. प्रकाश कांकिरया यांची नगर शहरातील भिंगार हद्दीत असलेल्या शेतजमिनीवरील (क्षेत्र ८०९३.७३ चौ. मी.) आरक्षण उठवण्यासाठी आणि ताबा घेण्यासाठी पवन चंदुलाल खेमाणी आणि चंदुलाल खेमाणी (दोघे रा. मुंबई) या पिता-पुत्रानी डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याकडून ७५ लाख रुपये घेतले. मात्र जमिनीवरील आरक्षणही उठवले नाही व जागेचा ताबाही दिला नाही.

त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी बनावट दस्तावेज तयार करून, मुखत्यार पत्र व खरेदी खताची बनावट ताबा पावती करून आर्थिक फसवणूक करून बदनामी केली. याप्रकरणी कांकरिया यांनी खेमाणी पिता-पुत्रांनी फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अभय परमार हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.