पक्ष संघटनेविरोधात जे काम करतील ते भाजपात नाहीत :- खासदार गांधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पक्षात जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांची दखल नक्कीच घेतली जाते. मात्र पक्ष संघटनेविरोधात जे काम करतील ते भाजपात नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी काल शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी स्पष्ट केले. 

 भाजप कार्यालयात गांधी यांनी नगरसेवक किशोर डागवाले, माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी व प्रशांत मुथा नवीन नियुक्तीचे पत्र दिल्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, एल. जी. गायकवाड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, जगन्नाथ निंबाळकर, गौतम दीक्षित, श्रीकांत साठे, दामोदर माखिजा, ॲड.राहुल रासकर, गणेश कोरडे उपस्थित होते. .

पूर्वीपासूनच भाजपचा मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मध्यंतरीचा काही काळ भाजपपासून लांब गेलो असलो तरी मनातून भाजपची निष्ठा कधीही सोडली नाही. आता अधिक जोमाने नगरमध्ये भाजपची ताकद वाढण्यासाठी काम करणार आहे. - किशोर डागवाले.

खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये एकनिष्ठ काम करणार आहे. भाजपची प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची फळी उभी करणार आहे. महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता व भाजपचाच आमदार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.- नरेंद्र कुलकर्णी.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.