पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस कर्मचा-यावर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर असे आरोपीचे नाव असून तो नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

आरोपी अकोलकर सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अकोलकरने पीडित तरूणीची ओळख वाढवून गेल्या सहा महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला. आरोपी अकोलकर विवाहीत असून पीडित युवती नगरमध्ये शिक्षणासाठी आली होती. 

या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेतील. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तिने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशन येथे मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVT - Smart Watch Phone With Camera, TF Card and Sim Card Support with all Smartphones. खरेदी करण्यासाठी इथे पुढील लिंकवर क्लिक करा http://amzn.to/2soYsTd


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.