नेवासा फाटा मारामारीतील जखमीचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा फाटा येथे १ जुलै रोजी दोन गटात हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या राहुल धनवटे याचा काल शुक्रवार दि. ७ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेवासा फाटा येथे दोन गटात मारामारी झाली होती. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. यातील जखमी राहुल धनवटे याच्यावर नगर येथे सिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याचे उपचार सुरू असताना निधन झाले. गुरुवारपासूनच नेवासा फाटा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

काल त्याचा मृतदेह नेवासा फाटा येथे त्याच्या घरी आणण्यात आला. यावेळी मोठा आक्रोश झाला. फाट्यावरील सर्व दुकाने यावेळी बंद होती. रात्री सात ते आठच्या दरम्यान नेवासा येथील अक्षरधाम येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेवासा फाटा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अमरधामच्या रस्त्यावरही मोठा बंदोबस्त तैनात होता. 

प्रशासनाकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले. शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजित शिवथारे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.