तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्याविरोधात गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ब्युटी पार्लरमध्ये पत्नी-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा पदाधिकारी परेश चंद्रकांत खराडे (रा.श्रीकृष्णनगर, कल्याणरोड, नगर), आणि दीपक ताडला (रा. दातरंगेमळा, नगर) यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, परेश खराडे याची पत्नी आजारी होती. तिला भेटण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी तरुणी व तिची मैत्रिण सोमवारी (दि. ३) सायंकाळी ७ वाजता गेली होती. यावेळी आरोपी परेश व त्याच्या पत्नीचे भांडण सुरु झाले. त्यांचे भाडण सोडविताना परेश व दीपक ताडला या दोघांनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. याप्रकरणी या तरुणीच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.