बंगला फोडून दीड लाखांची चोरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगार हद्दीत सुरू असलेल्या घरफोड्यांचे सत्र आता कोतवाली हद्दीतही वाढले आहे. कोतवाली हद्दीतील किरणकुमार नंदकिशोर सारडा यांचा बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरणकुमार सारडा यांचा एलआयसी कॉलनीमध्ये बंगला असून या बंगल्याच्या मागील दरवाजाची आतील कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 41 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सकाळी बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी सारडा यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगारपाठोपाठ आता शहरातही घरफोड्यांचे सत्र वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.