तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


27 जून 2017 सकाळी 11:30 वाजता बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडजवळ होंडा अमेज गाडीत तृप्ती देसाई सोबत जात होते. तेव्हा प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी अर्टिगा गाडीतून येऊन तक्रारदार विजय मकासरे (वय 33 वर्ष) यांच्यासमोर गाडी आडवी घातली. गाडी थांबवायला सांगून तृप्ती देसाईसह सर्वांनी लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली, असं विजय मकासरे यांनी सागितलं..

प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि 27 हजार रुपये काढून घेतले. तसंच तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.