एमआयडीसी येथे जुगार अड्डयावर छापा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एमआयडीसी भागातील काकासाहेब म्हस्के शाळेकडे जाणाऱ्या रोडलगत पत्तयाचा जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. यावेळी सात जणांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शब्बीर गफुर शेख (रा. साईराजनगर), विलास भाऊ भिंगारदिवे (रा. बोल्हेगाव ग, शकीर गफूर शेख (रा. साईराजनगर), अजिंक्‍य शंकर निमसे (रा. गांधीनगर), मोहन दगडू देठे (रा. बोल्हेगाव), बजरंग दत्तात्रय वाकळे (रा. बोल्हेगाव), ए.एस.जाधव (रा. गांधीनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. 

हे सर्व जण तिरट नावाचा पत्तयाचा जुगार खेळत होते. ही माहिती समजताच पोलीसांनी छापा टाकून त्यांच्यावर कारवाई केली.यावेळी त्यांच्याकडून 22 हजार 750 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.