एमआयडीसीत सुरक्षा रक्षकाने केला मालकाचा खून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर एमआयडीसीत जागेची सुरक्षा करण्यासाठी ठेवलेल्या सुरक्षा रक्षकानेच मालकचा खून केल्याची घटना उघड झाली असून याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक हिरदाराम सोमाई(वय ७०, रा.ठाणे) यांची एमआयडीसी हद्दीत जागा असून तेथे एक सुरक्षारक्षक त्यांनी नेमला होता. शुक्रवारी (दि.७) जागेची पाहणी करण्यासाठी तसेच सुरक्षा रक्षकास भेटण्यासाठी सोमाई नगरला आले होते. या दरम्यान रात्री ते तेथील एका खोलीत झोपण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात व्यक्तीने ठार मारल्याचे सांगण्यात आले.

या दरम्यान सुरक्षा रक्षक दोन दिवसांपासून पसार झाला होता. सोमाई यांच्या कुटुंबियांनी ते घरी का आले नाहीत, याची चौकशी केली असता जागेच्या गेटला कुलूप असून वाहन बाहेर पडलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर सोमाई यांचे पुण्यातील भाऊ नगरला आले व त्यांनी जागेची पाहणी केली असता त्यांना वास येऊ लागला. 

घटनास्थळी खून झाल्याचा संशय येताच अर्जुन सोमाई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील सुरक्षारक्षक फरार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अर्जून सोमई यांच्या फिर्यादीवरून अनिल लक्ष्मण गायकवाड याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.