लग्नाचे आमिष दाखवून साधूचा महिलेवर बलात्कार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील एका आश्रमातील साधूने मुंबई येथील ५२ वर्षीय महिलेवर चार वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.१०) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



याबाबत मुंबई येथील महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, नगर तालुक्यातील मजले चिंचोले येथील वेदांत आश्रमाचे साधू राजराजेश्वर यतीजी महाराज यांची आपणाशी मुंबई प्रवासात ओळख झाली. ओळखीनंतर साधूने माझा विश्वास संपादन करून तसेच मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर सन २०१३ ते २०१७ दरम्यान वारंवार शरीरसंबंध ठेवून अत्याचार केला.

या साधुचे इतर काही महिलांशी संबंध असल्याचा संशय मला आल्याने याबाबत मी त्या साधूस विचारणा करू लागली असता ते भारत भ्रमण करण्यास गेल्याचे मला समजले. त्यामुळे याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती देवडकर या करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing,Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


ADVT - Website Designing,Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Powered by Blogger.