माजी उपमहापौरांसह एकास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तीन दिवसांपूर्वी एकास केलेल्या मारहाणीच्या गुन्हयात माजी उपमहापौर नजीर मोहमंद नासिर शेख यांच्यासह एक जणास अटक करण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी काल रविवारी (दि.१६) केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कराचीवालानगर येथे तीन दिवसांपूर्वी जावेद शेख यांना नजीर मोहमंद नसिर शेख (रा. गुलमोबर रोड, नगर) व शौकत सब्जा अली चौबानी (रा.गोविंदपूरा,नगर) यांनी मारहाण केली. या मारहाणीत जावेद शेख गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोकॉ सनि वाघेला यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानूसार दोघांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.