महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे विभागीय कार्यवाहपदी जयंत येलूलकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांची महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या विभागीय कार्यवाह पदी नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्­वर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यकारीणी सभेमध्ये श्री. येलुलकर यांची एकमताने निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातील मातृसंस्था असलेल्या व १११ वर्षाची परंपरा असणाऱ्या पुणे म.सा.प.या प्रतिष्ठीत संस्थेत ही निवड होणे सन्मानाचे समजले जाते. 


ADVT - Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


श्री. येलुलकर यांनी अहमदनगरच्या साहित्य चळवळीला वेग येण्यासाठी म.सा.प.सावेडी उपनगर शाखा सुरु होण्यामध्ये पुढाकार घेतला. व गेली २ वर्षे सावेडी उपनगर म.सा.प.चे अध्यक्ष श्री.नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले उपक्रम राबवुन धडाडीने कार्य सुरु केले आहे. श्री. येलुलकर हे सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर समजलेल्या जाणाऱ्या रसिक गु्रपचे अध्यक्ष असुन अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे येथील महत्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे..

येलुलकर हे अहमदनगर नगर पालिकेच्या क्रिडा व सांस्कृतिक समितीचे माजी सभापती असुन कवयित्री संजीवनी खोजे स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल म.सा.प.चे विश्­वस्त श्री. यशवंतराव गडाख, नरेंद्र फिरोदिया, जेष्ठ साहित्यिक म.सा.प.चे जिल्हा प्रतिनिधी श्री.चंद्रकांत पालवे यांसह अभिनंदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.