राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांचा सत्कार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच जाहिर झालेल्या कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांचा सत्कार आ.अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सुमतीलाल कोठारी, प्रा.अरविंद शिंदे, अतुल भंडारी, ज्ञानदेव पांडूळे आदिंसह नवनिर्वाचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रा.माणिक विधाते यांनी सर्व समावेशक कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून, यामध्ये शहरासह उपनगरातील युवकांना संधी देण्यात आल्याचे सांगितले. तसेच शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमाचा आढावा घेतला.

आ.अरुण जगताप म्हणाले की, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व स्तरातील व समाजातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. वर्षभरात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रा.विधाते यांनी विविध उपक्रम राबविले. कार्यकारणीत डॉक्टर, वकिल, उद्योजक, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असून, चांगल्या प्रकारे पक्षाची पायाभरणीचे कार्य चालू आहे. राष्ट्रवादीच्या वतीने राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देण्यात आले असून, शरद पवार साहेबांच्या विचाराने शहरात कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.