शिक्षक, पालकांनी केलेल्या सूचनांचे पालन केल्यास यश नक्कीच - उपमहापौर छिंदम.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगला अभ्यास करुन यशाची एक-एक पायरी गाठली पाहिजे. शाळेतील शिक्षक, पालक यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास शालेय जीवनात यश नक्कीच मिळते. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीवर शिक्षक व पालकांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे, त्याचबरोबर मैदानी खेळातही आपण सहभाग घेऊन आपले शरीर तंदूरुस्त ठेवावे. समाजात आपण एकटे आहोत याचा न्यूनगंड न बाळगता यशस्वी विद्यार्थ्यांच्या मागे अनेकजण उभे राहत असतात, असे प्रतिपादन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केले. 

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने महात्मा फुले वसतीगृह येथे शहर उपाध्यक्ष उमेश साठे यांच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुवेंद्र गांधी, कैलास गिरवले, अज्जूभाई शेख, सोनम वैरागर, अविनाश साखला, सागर कराळे, दिपक उमाप, दादा बोठे, नितीन जोशी, विपुल पुप्पाल, पवन खंडेलवाल, शुभम गुंड, नितीन तागडकर, गोरख गवळी, विठ्ठल ढगे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक सुवेंद्र गांधी म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शालेय साहित्याचा उपयोग करुन चांगला अभ्यास करावा. जे विद्यार्थी नियमित अभ्यास करतात त्यांना यश नक्कीच मिळते. शिक्षक व पालकांचा आदर करावा. यातुनच आपले व्यक्तीमत्व बहरत जात असते. याप्रसंगी नगरसेवक कैलास गिरवले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करुन जीवनात यशस्वी व्हावे. त्यासाठी जिद्द, चिकाटीने अभ्यास करावा व वसतीगृहाचे नाव उज्वल करावे, असे सांगून वसतीगृहाची झालेली दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त करुन मनपाने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी उमेश साठे यांनी प्रास्तविकात सांगितले की, वसतीगृहातील विद्यार्थी हे चांगला अभ्यास करुन आपले भविष्य घडवत आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी भाजपाच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा हात दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू शेख यांनी केले तर आभार वसतीगृहाचे गणेश कोरडे यांनी मानले. यावेळी स्वप्नील अळकुटे, मारुती आळकुटे,रमेश चव्हाण, वैजनाथ राऊत, रवीराज रोहोकले आदिंसह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.