नम्रता दादी नानी ग्रुप आयोजित प्रवचनात ज्येष्ठ महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास आहे. सुख समाधान मिळविण्या साठी मनुष्य धडपडत असतो. प्रत्येकाने स्वत:च्या अंर्तमनात डोकावून पाहिले पाहिजे. भक्ती व समाधानाने जीवनात सुख, समृध्दी प्राप्त होते. मानवता हाच खरा धर्म असून, मनुष्यसेवा ही त्याची साधना आहे. सध्या धर्माच्या नावाखाली अज्ञानी लोक भांडत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. वृषाली गायकवाड यांनी केले.

नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित प्रवचन कार्यक्रमात वृषाली गायकवाड बोलत होत्या. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, ग्रुपच्या सचिव अनिता काळे, अलका मुनोत, अलका मेहेर, दिपा मालू, वीणा बंग, प्रिती झंवर आदिंसह ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात अनिता काळे म्हणाल्या की, कौटुंबीक जबाबदारी सांभाळताना सर्वाधिक तानतणाव ज्येष्ठ महिलांवर येते. त्यांच्या तणावमुक्तीसाठी ग्रुपच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. ह.भ.प. वृषाली गायकवाड यांनी पुढे कुटुंबाचे आनंदी वातावरण, सुख, शांती व परमार्थ याविषयाचा उलगडा केला. 

या प्रवचनाने उपस्थित महिला मंत्रमुग्ध झाल्या. महिलांसाठी घेण्यात आलेल्या बौध्दिक स्पर्धेतील दहा विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसवितरण करण्यात आले. वीणा बंग हे या स्पर्धेच्या बक्षिसांचे प्रायोजक होत्या.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.