भिंगार छावणी कार्यालयावर शुक्रवारी घरकुल वंचितांचा धडक मोर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशातील घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान आवास योजना छावणी हद्दीत लागू करण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.7 जुलै रोजी भिंगार छावणी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास असक्षम असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साडी-चोलीचा आहेर दिला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या घरकुल वंचितांचा घराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना लागू करण्यात आली. योजनेची घोषणा होवून तीन वर्षे उलटले असताना मनपा हद्दीत फक्त अर्ज जमा करण्यात आले. त्याची छाननी प्रक्रिया चालू आहे. मात्र छावणी हद्दीत ही योजना लागू नसल्याने घरकुल वंचितांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सदर योजना छावणी हद्दीत राबविण्यासाठी संघटनेच्या वतीने छावणी कार्यालयावर मोर्चे काढून निवेदने देण्यात आली. 

मात्र सदर योजना कार्यान्वीत करण्यासाठी छावणी प्रशासनाचे अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत नसल्याने छावणी हद्दीतील घरकुल वंचितांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने छावणी हद्दीतील घरकुल वंचित सहभागी होणार असून, आंदोलनासाठी अ‍ॅड.गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, वैशाली नागपुरे, शारदा भालेकर, हिराबाई ग्यानप्पा प्रयत्नशील आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.