मुकुंदनगर मुले अपहरण प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगर परिसरात मुले अपहरण प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी अल इन्साफ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती सालिम चाऊस, ताहीर शेख आदिंसह मुकुंदनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुकुंदनगर भागात मुले अपहरणाचा प्रयत्न नागरिकांकडून नुकताच हाणून पाडण्यात आला. चारचाकी वाहनात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन अल्पवयीन मुलांना बसविले जाते. एका युवकाला ही बाब खटकल्याने तो गाडी अडवून आसपासच्या नागरिकांना घेवून त्या बालकांची सुटका करतो. या महिलेस मुलांना गाडीत बसविण्याचे कारण विचारले असता, नॅपकीनचे दुकान शोधत असल्याचे उत्तर मिळते. शहर सोडून सदर महिला नॅपकिन खरेदीसाठी मुकुंदनगरमध्ये येते. ही घटना संशयास्पद असल्याचा आरोप फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात देऊनही तिला अटक न होता, घरी नेवून सोडण्यात आले. जे नागरिक महिले विरुध्द तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले त्यांच्याविरुध्दच मारहाण, विनयभंग व जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 40 ते 50 नागरिकांनी मारहाण केल्याचा आरोप सदर महिलेने केला. मात्र एखाद्या व्यक्तीस एवढ्या लोकांनी मारहाण झाल्यावर तो गंभीर जखमी झाला असता. 

मात्र सदर महिला लगेच मोर्चात सहभागी होत असून, सदर आरोप खोटा असल्याचे फाऊंडेशनचे म्हणने आहे. या प्रकरणात अल्पसंख्यांक समाजातील युवकांना बदनाम करण्याचे षडयंत्र असून, दोन समाजात द्वेष पसरविला जात आहे. पोलिस तपास देखील एकतर्फी चालू आहे. अमावस्येच्या आदल्या रात्री, बनावट गाडी नंबर असलेल्या वाहनात अल्पवयीन मुलांना बसविण्यात येते. ही घटना बळी देण्याच्या प्रकाराकडे इशारा देत आहे. 

अनेक निर्दोष अल्पसंख्यांक समाजातील युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे मुफ्ती सालिम चाऊस यांनी म्हंटले आहे. सदर महिलेकडून मिळालेले उत्तर, पोलिसांकडे देण्यात आलेली तक्रार व वृत्तवाहिण्यांना देण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असून, या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.