चिमुकल्यांच्या दिंडीने परिसर विठ्ठल नामाने दुमदुमला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विठ्ठल..विठ्ठल... विठ्ठला... हरि ओम विठ्ठला..., विठ्ठल नामाची शाळा भरली... माऊली.. माऊली.. अशा विठ्ठलनामाने चिमुकल्यांनी परिसारातून दिंडी काढून परिसर दुमदुमून सोडला. या दिंडीत बालवारकरी हातात भगव्या पतका, टाळ, मृदूंग, विणा घेऊन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी... या गाण्यातून वृक्षारोपण व वृक्षसंवधानाच्या घोषणादेऊन वृक्षलागवडीचे महत्व परिसारातील नागरिकांना पटवून देत होते. 

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर येथील शिशु संगोपन संस्थेच्या पूर्व प्राथमिक वर्गाची दिंडी काढण्यात आली होती. यावेळी या दिंडीतील विठ्ठल-रुख्मीणीच्या पालखीतील मूर्तींचे पूजन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों. कासवा, विश्‍वस्त अ‍ॅड.विजय मुनोत यावेळी मुख्याध्यापिका रुख्मिणी नन्नवरे, विनोद कटारिया, प्राथ.शिक्षिका अनुराधा घोलप, आर.एस.जोर्वेकर, राजश्री दिवटे उपस्थित होत्या. 

नटलेल्या चिमुकले सर्वांचे आकर्षण ठरले. यामध्ये संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, मुक्ताबाई, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, झाशीची राणी, मदर तेरेसा आदिंच्या वेषभूशा असलेल्या चिमुकल्यांनी स्त्री भ्रुण हत्या, मुलींच्या जन्माचे स्वागत, पर्यावरण रक्षण आदि जनजागृती फलक हातात घेऊन व घोषणात देत शाळेच्या परिसरातून दिंंडी काढली. या दिंडीचे परिसरातील नागरिकांनी हार,फुले वाहून स्वागत केले व चिमुकल्यांचे कौतुक केले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा म्हणाले, दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनामध्ये धार्मिक व एकात्मिक भावना निर्माण होत असते. त्याचबरोबर वृक्षाचे महत्व नागरिकांना कळावे यासाठी वृक्षदिंडीने संदेश दिला. वाव मिळवून त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत असते.

त्याच बरोबर बालपणापासून वृक्षारोपणाबद्दल जनजागृती केल्यास वृक्ष संवर्धनाबद्दल आपुलकी निर्माण होऊ शकते. संस्थेच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत असता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुराधा घोलप यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका रुख्मिणी नन्नवरे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.