महापौरांच्या हस्ते माळीवाडा येथील विठ्ठल मंदिरात महापुजा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आषाढी एकादशीनिमित्त नगर शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माळीवाडा येथे असलेल्या श्री संत सावता माळी व विठ्ठल-रुख्मीणी मंदिर येथे माळीवाडा पंच मंडळ देवस्थानच्यावतीने महापौर सुरेखा कदम व संभाजी कदम यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली. 


याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, नगरसेविका सुवर्णा जाधव, शहर बँकेच्या संचालिका रेश्मा आठरे, देवस्थानचे विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, बाबासाहेब सुडके, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, दत्ता जाधव, बाबासाहेब सुडके, अशेाकराव कापरे, गणेश राऊत आदि उपस्थित होते. 

यावेळी आलेल्या भाविकांना मान्यवरांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले की, मागील वर्षीपासून देवस्थानच्यावतीने शहराच्या प्रथम नागरिक महापौरांचा आषाढी एकादशीच्या दिवशी महापूजा करण्याचा मान देण्यात येतो. यावर्षी महापौर सुरेखा व संभाजी कदम यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. ही परंपरा यापुढेही अशीच सुरु राहील, असे त्यांनी सांगितले. 

तसेच शहरातील मल्हार चौक, कोर्टगल्ली, माळीवाडा, गंजबाजार, तोफखाना, सारसनगर, केडगांव, भिंगार, सावेडी आदि भागातील विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी होती. मंदिरावर फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 

विविध भजनी मंडळाने मंदिरात भजनाने वातावरण भक्तीमय करण्यात झाले होते. तसेच शाळातील विद्यार्थ्यांना दिंड्या काढून विठ्ठल नामाच्या घोषाने परिसर दुमदुम सोडला होता. बाजारात खजुर, शेंगा, रताळे, बटाटे आदि उपवसाच्या पदार्थां घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अनेक छोट्या-मोठ्या हॉटेल व स्टॉल, हातगाड्यांवर फक्त उपवसांचे पदार्थ ठेवण्यात आले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.