लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व प्राईडचा पदग्रहण सोहळा उत्साहात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लायन्सच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात मिळाला आहे. शेवटच्या घटका पर्यंन्त मदत पोहचवून, समाजातील अनेक प्रश्‍न सोडविण्याचे काम क्लबच्या वतीने चालू आहे. सुवर्ण महोत्सवीवर्ष वंचितांच्या सेवेने साजरे करण्याचे आवाहन एम.जे.एफ. रमेश शाह यांनी करुन, मागील कार्यकारणीने घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व नवीन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. 
 
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व प्राईडचा सयुंक्त पदग्रहण सोहळ्या प्रसंगी एम.जे. एफ. शाह बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतीय अध्यक्ष संदिप कोयते, प्रांतीय खजिनदार प्रवीण गुलाटी, विभागीय अध्यक्ष सी.ए. किरण भंडारी, प्रवीण गुलाटी, आर.के. शाह, आशिष बोरावके आदिंसह क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत प्रशांत मुनोत यांनी केले. जस्मीतसिंह वधवा व अभिजीत भलगट यांनी शाह यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे नवनिर्वाचित सचिव आनंद बोरा, खजिनदार डॉ. मानसी असणानी, लायन्स प्राईडचे सचिव डॉ.कृष्णा जाजू व खजिनदार डॉ.रोहित धूत यांना पदभार सोपविण्यात आला. लायन्स क्लबच्या वतीने सन 2017-18 शतक महोत्सवीवर्ष भरीव सामाजिक कार्याने साजरा करण्याचा दोन्ही क्लबच्या पदाधिकार्‍यांनी संकल्प केला. अमोरा वधवा व मेघा असणानी या विद्यार्थिनींनी मुलगी शिकवा व वाचवाचा संदेश दिला.

मेडिकल एड लायब्ररीचा विस्तार, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वंचितांचा दिवाळी मेळावा व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम घेण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष जस्मीतसिंह वधवा यांनी व्यक्त केला. प्राईडचे अध्यक्ष अभिजीत भलगट यांनी गाव दत्तक घेवून, स्वच्छता व वृक्षरोपण अभियान राबविण्यात येणार असून, सोशल मिडीयाने युवकांचे संघटन करुन सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

प्राईडचे मावळते अध्यक्ष मनयोगसिंह माखीजा यांनी भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबीर, दर आठवड्याला दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे पौष्टिक आहाराच्या उपक्रमाबद्दल माहिती देवून, 
विविध उपक्रमाचा अहवाल मांडला.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी धनंजय भंडारे, सुनील छाजेड, विपुल शाह, गगन वधवा, मनीष सोमाणी, डॉ.अमित बडवे, योगेश भंडारी, महेश बजाज, राजू संधू, हरजीतसिंह वधवा, डॉ.दीपाली भलगट, हरमीतकौर माखिजा, डॉ.नेहा जाजू, अजितसिंह वधवा आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सिमरनकौर वधवा व रवी तुमनपेल्ली यांनी केले. आभार सनी वधवा यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.