भारतीय संस्कृती व लोकनृत्याचा समावेश असलेल्या फोक फिटनेसचा शुभारंभ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :
गुजरातचा गरबा, महाराष्ट्राची लावणी, राजस्थानचा घुमर, पंजाबचा भांगडा व आसामचा बिहू या भारतातील संस्कृती व लोकनृत्याचा कलाविष्कार असलेल्या खास महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या फोक फिटनेसचे उद्घाटन डॉ.वैशाली किरण यांच्या हस्ते झाले. 

जुना कापड बाजार व्यापारी क्लबच्या सभागृहात झालेल्या फोक फिटनेसच्या मोफत कार्यशाळेस महिला व युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मनाला पारंपारिक संगीताचा आनंद व शरीराला व्यायाम देणार्‍या नृत्याची संकल्पना यामध्ये आहे.

प्रास्ताविकात श्रध्दा देडगावकर म्हणाल्या की, अनेक जबाबदार्‍या पार पाडताना महिला तणावाखाली असतात. फोक फिटनेसच्या माध्यमातून लोकनृत्यावर संगीताचा आनंद घेवून, नृत्याद्वारे महिलांचा शाररीक व्यायाम होणार आहे. लोकगीतांवर नृत्य करण्यास भरपूर ऊर्जा लागते. यामुळे मन शांत होवून, स्वास्थही उत्तम राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.वैशाली किरण म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात कौटुंबीक जबाबदारी सांभाळतांना महिलांची जीवन पध्दती तणावपुर्ण बनली आहे. मानसिक व शाररीक आरोग्यासाठी महिलांना फोक फिटनेसची आवश्यकता आहे. महिलांचे आरोग्य सदृढ असल्यास त्या कौटुंबीक जबाबदारी सक्षमपणे सांभाळू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी रंजना देडगावकर, रेणुका गांधी, वैशाली मालपाणी, शीतल दहीवाळकर, अंजना शहा, मोना पितळे आदि उपस्थित होत्या. सोमवार ते शुक्रवार या बॅचेस चालणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महिलांना करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.