निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक व धार्मिक कार्यात घालवावा-अरुण शिंदे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे आपण करत असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा देत असतो. या काळात अनेक चांगले-वाईट लोक भेटतात, परंतु आपण आपली कर्तव्य पूर्ण करत असतो. यातून आता आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण आपला पुढील कार्यकाळ हा समाज हितासाठी आणि धार्मिक कार्यासाठी द्यावा, त्यातून मिळणारे समाधान हे आपले पुढील जीवन आनंदमयी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक अरुण शिंदे यांनी केले. 

मनपा कर्मचारी दशरथ गायकवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त माजी नगरसेवक अरुण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किशोर फुलसौंदर, अभय बोरुडे, गोरख बोरुडे, सयाजी पाचारणे, संतोष जाधव, हरिष रावत, अशोक कुलाळ, माऊली जाधव आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना श्री.गायकवाड म्हणाले, मनपात काम करताना अनेक लोकांशी संबंध आला. 

या कालावधीत अनेक कटू-गोड अनुभव आहेत. वॉलमन म्हणून नागरिकांशी प्रत्यक्ष संबंधित काम असल्याने त्यात पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने रात्रं-दिवस काम करावे लागत होते. त्यामुळे कुटूंबाकडे दुर्लक्ष होत असे परंतु आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले, याचा अभिमान आहे, असे सांगितले. श्री. गायकवाड यांच्या निवृत्तीबद्दल अनेकांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.