वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनात नागरिकांचा सहभाग महत्वाचा - महापौर कदम


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मानवाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे मोठे संकट सर्वत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्व लक्षात आल्याने शासकीय पातळी तसेच अनेक सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण व संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. आपली येणारी पिढी निरोगी व प्रदुषणमुक्त रहावी, असे वाटत असेल तर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे. यासाठी मनापाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु नागरिकांचा यात सहभाग हा कमी प्रमाणात लाभतो. त्यासाठी नागरिकांनी आपल्या व आपल्या पुढील पिढीसाठी या वृक्षचळवळीत सहभाग द्यावा, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले. 

मनपाच्यावतीने बेग पटांगण येथे महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती सचिन जाधव, सभागृहनेते अनिल शिंदे, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे,माजी शहरप्रमुख संभाजी कदम, कांचन कांकरिया, किसन गोयल, यु.जी.म्हसे, जितू पाटकुले, हुसेनभाई, भोला पठाण, बाबा बागवान, दिपक बेग,फैज बागवान, संतोष तनपुरे आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना महापौर कदम म्हणाल्या, राज्य शासनाच्यावतीने राज्यात 4 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाच्यावतीने शहर हद्दीत 8 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यात आपलाही वाटा असेल. मनपाच्यावतीने ठिकठिकाणी वृक्ष लागवड करुन ट्रीगार्ड लावण्यात येणार आहेत. या वृक्षांना नागरिकांनी दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. 

याप्रसंगी सचिन जाधव म्हणाले, मनपाच्यावतीने वृक्षसंवर्धनासाठी विविध भागात वृक्ष लावण्यात येत आहेत. नागरिकांना या वृक्षांना नियमित पाणी घालून जनावरांपासून त्यांचे संरक्षण करावे.जेणे करुन काही कालावधीतच हे वृक्ष मोठे होतील व परिसर बहरुन निघेल. 

यावेळी अनिल शिंदे म्हणाले, वृक्षारोपण हे महत्वाचे आहे. नागरिकांनी त्यात आपलाही सहभाग दिला पाहिजे. मनपा व शासनाच्यावतीने नागरिकांना रोपे वाटण्यात येत आहेत, त्याचे संगोपन करुन संवर्धन केले पाहिजे. हे आपल्या पुढील पिढीसाठी आवश्यक आहे. 

यावेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले, मनपाच्यावतीने प्रभागातील अनेक मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला वृक्षा लावण्यात येत आहे. या वृक्षांचे संवर्धन परिसारातील नागरिकांनी करावे. वाढते प्रदुषण व तापमान यावर वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन हे महत्वाचे आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन गोयल यांनी केले तर आभार यु.जी.म्हसे यांनी मानले. कार्यक्रमास परिसारातील नागरिक उपस्थित होते. यावेळी काही महिलांनी वृक्ष दत्तक घेण्याचे जाहीर केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.