जेनेरिक औषधामुळे रुग्णांचा मोठा फायदा होईल - महापौर कदम

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक व्याधी त्यास जडत असल्याने तो पुरता बेजार होऊन जात आहे. त्यातच दवाखान्या वाढता खर्च पाहता हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालला आहे. त्यामुळे अशा रुग्णांना जर स्वस्तात औषधे उपलब्ध झाली तरी त्यांचा आरोग्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. जेनेरीक औषधे ही इतर मोठ-मोठ्या कंपन्यांच्या औषधांपेक्षा स्वस्त व प्रभावशाली असल्याने त्यांचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले. 


झोपडी कॅन्टीन समोरील गायत्री स्वस्त औषध सेवा या जेनेरिक औषधी दुकानाचा शुभारंभ महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाला याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास संचालक सौ.गायत्री सातपुते, गौतम सातपुते, विजय घासे, मंगल घासे, नगरसेवक अनिल बोरुडे, डॉ.अनिल आठरे पा., डॉ.सागर बोरुडे, डॉ.व्ही.एस. बुरवले, प्राचार्य सौ.कांचन गावडे, डॉ.अरुण बोरुडे, डॉ.अमोल जाधव, शशिकांत महाजन,दिनेश शिंदे,अशोक कानडे,बाळासाहेब पुलाटे, डॉ.खोकराळे आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना महापौर सौ.कदम म्हणाल्या, आज शहरात इतर मेडिकल स्टोअर्सच्या प्रमाणात जेरेरिक औषधाची दुकानेही वाढत आहेत. त्यामुळे गरजूंना याचा मोठा फायदा होत आहे. सावेडी भागात अनेक हॉस्पिटल आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठी आहे. झोपडी कॅन्टीन भागातील या गायत्री स्वस्त औषधी सेवेमुळे या रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे सांगितले. 

याप्रसंगी प्रास्तविकात संचालिका गायत्री सातपुते म्हणाल्या, जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा 30 ते 70 टक्क स्वस्त असतात. एखादी कंपनीने निर्माण केलेल्या औषधाचे पेटेंट घेतात, पेटेंटचा कालावधी संपल्यानंतर त्या कंपनीचा त्या औषधावरील अधिकार संपतो व कोणतीही कंपनी ते औषध तयार करु शकते, त्यामुळे ही औषधे अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. त्याचा रुग्णांनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी विजय घासे म्हणाले, स्वस्त औषधे मिळणार असल्याने परिसारातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी यातही सूट दिली जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सातपुते यांनी केले तर मंगल घासे यांनी आभार मानले. यावेळी डॉ.गंधे, डॉ.साळूंके, शिवाजी साळवे, संजय खामकर, सुभाष चिंधे, निलेश बांगरे, प्रसाद भडके आदिंसह परिसारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.