अमरनाथ यात्रा थांबणार नसल्याचा संदेश देत भाविक अमरनाथ यात्रेला रवाना.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दहशतवादी हल्ल्यांनी अमरनाथ यात्रा थांबणार नसल्याचा संदेश देत, नगर मधील भाविक बुधवारी अमरनाथ यात्रेला रवाना झाले. प्रजा चालक-मालक रिक्षा संघटनेच्या वतीने यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांना रेल्वे स्थानक येथे शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी भैय्या पठाण, विष्णू आंबेकर, रईस शेख, कलिम पठाण, शफिक बागवान, यासीन शेख, रशीद शेख, लक्ष्मण बोरकर, अभय पतंगे, साजिद पठाण, गणेश अतोले, अमीत भोपळे, वैभव उणवणे, सागर सोळबडे, सलिम शेख, अशोक मांढरे आदि उपस्थित होते.

देशात शांतता नांदावी, शत्रूपासून देशाचे संरक्षण व मुबलक प्रमाणात पाऊस पडण्याची प्रार्थना बाबा अमरनाथ यांच्याकडे करण्यात येणार आहे. दहशतवादी कारवाया करुन, देशातील शांतता भंग करण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश आहे. 

हल्ला करुन यात्रा थांबणार नाही तर मोठ्या संख्येने भाविकांचा जथ्था अमरनाथकडे येणार असल्याची भावाना अभय पतंगे व अशोक मांढरे यांनी व्यक्त केली. रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सभासद देखील या यात्रेसाठी रवाना झाले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.