सावेडीतील दत्त देवस्थानच्या ट्रस्टींना मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावेडी येथील दत्त देवस्थान ट्रस्टच्या पदाचा राजीनामा द्या असे म्हणून २५ ते ३० जणांच्या जमावाने मुंबई येथील ट्रस्टीस शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्याची घटना रविवारी (दि. ९) सकाळी साडेअकरा वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नितीन श्रीनिवास जोगळेकर व राजन जोशी (रा. सदाशिव पेठ, पुणे) हे दत्त देवस्थान सावेडी येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्ताने आले असता परदेशी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. काजरोळकर मुंबई) व अन्य महिला व पुरुष असे २५ ते ३० जणांनी जोगळेकर यांना बळजबरीने डांबून तुम्ही ताबडतोब पदाचा राजीनामा द्या असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.

तसेच जोगळेकर यांच्या गळ्यातील १९ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि ५ हजार रुपये असा ऐवज बळजबरीने चोरुन नेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जोगळेकर यांच्या फिर्यादीवरुन दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास काळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Powered by Blogger.