श्री शिवशंभो प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, चळवळीतील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणार्‍या श्री.शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक मान्यवरांना शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षकरत्न, समाज क्षेत्रासाठी समाजरत्न, कला क्षेत्रासाठी कलरत्न, क्रीडा क्षेत्रासाठी क्रीडारत्न, पत्रकारिता क्षेत्रासाठी पत्ररत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच कोणताही आधार नसतांना आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आपल्या मुलांना घडविणार्‍या त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करुन देणार्‍या महिलेसाठी कै.मैनाबाई पवार स्मृती पुरस्कार प्रतिष्ठाण मार्फत दिला जात असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजी अण्णा कराळे, व स्वागताध्यक्ष ज्ञानदेव उर्फ बाळासाहेब पवार यांनी दिली.

श्री शिवशंभो प्रतिष्ठान तर्फे या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षकरत्न, समाज क्षेत्रासाठी समाजरत्न, कला क्षेत्रासाठी कलारत्न, क्रीडा क्षेत्रासाठी क्रीडारत्न, पत्रकारिता क्षेत्रासाठी पत्ररत्न या पुरस्कारांनी सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील व कला क्रीडा क्षेत्रातील आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींनी सन्मनित केले जाणार आहे. 

वरील राज्यस्तरीय पुरसकारसाठी वरील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींनी आपले प्रस्ताव 31 जुलै 2017 पर्यंतच पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. या पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविणार्‍यांनी प्रस्तावाबरोबर आपला अल्प परिचय, चार पासपोर्ट साईज रंगीत फोटो, दोन मान्यवर व्यक्तीचें शिफारसपत्र, आपण केेलेल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलची वृत्तपत्रातील कात्रने, साहित्यरत्न पुरस्कारासाठी लेखकाने व कवीने आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती तसेच पुरस्कार पाकीटावर कोणत्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविला आहे असा ठळक अक्षरात उल्लेख करुन

बाळासाहेब पवार स्वागताध्यक्ष श्री शिवशंभो प्रतिष्ठान, व्दारा ओम भुईकाटा, ओम गार्डन मंगल कार्यालयाजवळ, नगर-पुणे रोड, अहमदनगर मोबा.7350564848 पिन कोड नंबर 414 001 या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवावीत असे आवाहन पुरस्कार समितीचे सचिन ठाणगे, बापुसाहेब फणसे, पत्रकार सुर्यकांत नेटके, प्रा.डॉ.बा.बा.पवार, विजय आमटे सर, शिवाजी खुडे सर, कार्याध्यक्ष रामदास मुळीक, विनायक तळेकर, महादेव आमले सर आदींनी केले आहे. 

अपूर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत व निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. तसेच ज्या सन्माननीय व्यक्तींचे पुरस्कारासाठी निवड झालेली असेल त्यांचे व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचे प्रस्ताव परत दिले जाणार नाहीत अशी माहिती प्रतिष्ठाणचे श्री कांतीलाल गर्जे सर, भास्कर पालवे, पत्रकार मिलिंद चंवडके, दिलीप गारुडकर, सत्यजीत कराळे, ओम गर्जे, विनोद मुळीक, विश्‍वजीत कराळे यांनी दिली आहे. 

पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे पदाधिकारी रत्नाकर ठाणगे, प्रेम तळेकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री बाळासाहेब पवार 7350564848 व सचिन ठाणगे सर 7588600293

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.