चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची घरकुल वंचितांची शपथ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चायना मेड वस्तूंवर बहिष्कार टाकण्याकरीता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनातील घरकुल वंचित पुढे सरसावले असून, चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित स्वदेशी हिंद फौज स्थापनेचा ठराव मांडण्यात आला. 

यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अर्चना आढाव, शारदा भालेकर, शाहीर कान्हू सुंबे, हरीभाऊ हारेर, वैशाली नागपुरे, नितू पगारे, विठ्ठल सुरम, लता शिंदे आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भारताशी नेहमी युध्दाची भाषा करणार्‍या चीनची अर्थव्यवस्था मोडीत काढण्यासाठी देशातील नागरिकांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतामध्ये चीनच्या विविध उत्पादनांचा खप मोठ्या प्रमाणात आहे. चीनची नाकेबंदी करण्यासाठी त्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.

अशोक सब्बन म्हणाले की, चिनीमाल खरेदी करुन भारतीय नागरिक आपल्या शत्रूंना प्रोत्साहन देत आहे. सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख असून, प्रत्येक नागरिकांनी मनावर घेतल्यास चीनची अर्थव्यस्था डबघाईस आल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने स्वदेशी हिंद फौजची स्थापना करण्यात येणार आहे. या संघटनच्या माध्यमातून चिनी मालावर बहिष्कार टाकून, स्वदेशी माल स्विकारण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. या संघटनमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाणार असून, लवकरच शहर व गाव पातळीवर संघटन केले जाणार असल्याचे बैठकित स्पष्ट करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.