गोदावरी व भिमा नदीत पाणी सोडल्‍यामुळे नदी काठच्‍या नागरिकांनी सतर्क रहावे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नाशिक जिल्‍ह्यात झालेल्‍या पावसामुळे 15 जुलै, 2017 पासून नांदुर मध्‍यमेश्‍वर बंधा-यातून गोदावरी पात्रात 22,384 क्‍युसेक्‍स पाण्‍याचा तर पुणे जिल्‍ह्यात झालेल्‍या पावसामुळे भिमा नदीस दौण्‍ड पुल येथे 24,127 क्‍युसेस पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. या भागात पाऊस वाढल्‍यास विसर्गातही वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

त्‍यामुळे अहमदनगर जिल्‍ह्यातील गोदावरी नदी काठावरील कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तसेच भिमा नदी काठावरील श्रीगोंदा, कर्जत या तालुक्‍यातील नागरिकांना सुरक्षेच्‍यादृष्‍टीने नदी पात्रापासून दूर रहावे. नदीकाठावर राहत असल्‍यास सुरक्षीत ठिकाणी स्‍थलांतर करावे. पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पूल ओलांडू नये असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण गोपिचंद कदम यांनी एका पत्रकान्‍वये केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.