एटीएमद्वारे १५ हजारांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेत बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास एटीएममध्ये पैसे न भरता परस्पर दुसऱ्या खात्यात अनोळखी व्यक्तीने १५ हजार रुपये भरून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय पंढरीनाथ कोठुळे (रा. खडकी, ता. नगर) हे स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेत पैसे भरण्यास आले असता त्यांना आपल्या खात्यामध्ये एटीएमद्वारे पैसे भरताना अडचण येत होती. यावेळी तेथे जवळच उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना मदत करतो असे सांगत १५ हजार रुपये परस्पर दुसऱ्याच खात्यात भरून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी कोठुळे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला हवालदार अमिना शेख या करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.