उत्कृष्ट कामांमुळे संगमनेर नगरपालिकेचा राज्यात लौकिक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्‍याच्या विकासात विविध संस्थांसह नगरपालिकेचे भरीव योगदान असून, पालिकेच्या वतीने शहरात सातत्याने विविध विकासकामे सुरू आहेत. येथील कारभार व नियोजन इतरांसाठीदेखील अनुकरणीय असून उत्कृष्ट कामांमुळे पालिकेचा राज्यात लौकिक असल्याचे गौरवोद्‌गार माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका प्रांगणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय रकमेचे वाटप, नव्याने सुरू करण्यात आलेल्या मोबाइल ऍपचा प्रारंभ, तसेच गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला; यावेळी आमदार थोरात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. शिवाजीराव थोरात, नगराध्यक्षा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक विश्‍वास मुर्तडक,डॉ. दानिश खान, सुनंदा दिघे, नूरमोहंमद शेख, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, किशोर टोकसे, योगिता पवार यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, आपण सातत्याने विकासकामांना प्राधान्य दिले आहे. विकासकामांत कधीही भेदभाव केला नाही. नगरपालिकेच्या विकासात आजपर्यंतचे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका कर्मचारी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. नगरपालिकेच्या पारदर्शकतेची व स्वच्छतेविषयक कामांची राज्य सरकारनेही दखल घेत 2 कोटींचे बक्षीस देऊन गौरव केला आहे. शहरात सातत्याने विकासकामे सुरू असून यापुढील काळातही नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी पालिका कायम कटिबद्ध राहील.

आ. डॉ. तांबे म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍याचा विकास सुरू असून नगरपालिकेच्या माध्यमातूनही शहरात विकासकामे केली जात आहेत. पालिकेचे राज्यात आदर्शवत असे काम सुरू आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांनी कायम विकासकामांना प्राधान्य देत पालिकेला प्रगतिपथावर पोहोचविले आहे.

नगराध्यक्षा तांबे यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वच्छ, सुंदर व हरित संगमनेरचे स्वप्न पाहिले. या कामी आ. थोरात, आ. तांबे तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी व नागरिक यांनी मोठे सहकार्य केल्याचे व यापुढील काळातही तालुक्‍याला सुजलाम सुफलाम बनविणे हाच आपला मानस असल्याचे सांगितले.

मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी पालिकेच्या मोबाइल ऍपविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी नगरसेविका सुहासिनी गुंजाळ, रूपाली औटी, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, निर्मला गुंजाळ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, शेख रियाज, शफी तांबोळी, निखिल पापडेजा, आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.