शहरांच्या गप्पा करतांना सरकारचा ग्रामीण जनतेवर अन्याय - आ.थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केंद्र व राज्यातील सरकार हे शहरांविषयी गप्पा करणारे असून ग्रामीण भागाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे. सरकार बदलल्याचे परिणाम आता जनतेला कळत आहे. राज्य सरकारची कर्जमाफी वेगवेगळ्या अटी लावून केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याची टिका माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर केली.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु।। येथे रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृह व स्व.गुलाबराव शंकरराव वलवे व्यापारी संकुलाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ.डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर माधवराव कानवडे, रोहिदास डेरे, जि.प. कृषी सभापती अजय फटांगरे, सभापती निशाताई कोकणे, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, सरपंच सिंधूताई तोरकडी, स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने, तहसिलदार प्रियंका आंबेकर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, धांदरफळ बुद्रुक गावची संगमनेर तालुक्याच्या विकासात मोठी साथ राहिली आहे. धांदरफळ सोसायटीची इमारत ही स्व.गुलाबराव वलवे यांच्या काळात झाली. विकास कामांच्या बाजूने राहण्याची धांदरफळ ग्रामस्थांची पद्धत आहे. आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला मोठी साथ येथे मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या विरोधातील आहे. शहरांच्या गप्पा करतांना त्यांनी ग्रामीण जनतेवर अन्याय चालविला आहे, असेही आ.थोरात यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.