ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे रविवारी लोकार्पण.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नवनागापुर परिसरातील गजानन कॉलनी येथील ऍप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रविवारी ( दि. 16 ) सकाळी 11 वाजता नगरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. रुग्णसेवेच्या सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त या हॉस्पिटलचे लोकार्पण आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे अशी माहिती संचालक डॉ. संजीव गडगे यांनी दिली.

रविवारी आयोजित या लोकार्पण सोहळ्याला पुण्याच्या के ई एम हॉस्पिटलचे डॉ. राजेश गादिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, अहमदनगर हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बापुसाहेब कांडेकर, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. रजिया निसार, निमाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र मिरगणे, होमिओपॅथी असो.चे अध्यक्ष डॉ. विजय पवार, एम आय डी सी डॉक्टर्स असो.चे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे तसेच एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे नुतन हॉस्पिटल वडगांव गुप्ता रोडवरील धुमाळ प्राईड या प्रशस्त वास्तुत साकारले असुन तेथे 30 बेडचा जनरल वॉर्ड व 5 बेडचे अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसुती गृह असलेल्या या हॉस्पिटलमध्ये बाल रोग, स्त्री रोग, अस्थिरोग, सर्जरी , मेडीसिन, फिजीओथेरपी असे स्वतंत्र विभाग आहेत. तसेच येथे होमिओपॅथी. आयुर्वेद उपचारासाठीही स्वतंत्र कक्ष आहेत. दाखल रुग्णावर 24 तास वैदकीय सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम कार्यरत असेल.

रविवारी होणा-या लोकार्पण सोहळ्याला नगरकरांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. गडगे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.