जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून नगरचा विकास करणार - अनिल राठोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता ठिकठिकाणी पाणी साचले जाते. त्यामुळे नाल्या तंबुन त्यातील घाण रस्त्यावर येते, तसेच पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे या गल्ल्याबोळातील ड्रेनेज, पिण्याच्या पाईपलाईन बरोबरच रस्त्याचे कॉक्रीटीकरण चांगल्या पद्धतीने केल्यास रस्त्यात पाणीही साठणार नाही आणि पुढील समस्याही निर्माण होणार नाहीत. त्यासाठी नागरिकांनी आपल्या भागात होणार्‍या कामांवर लक्ष ठेवून ते व्यवस्थीत करुन घ्यावे. त्यामुळे आपला भाग हा स्वच्छ व सुंदर राहील. यासाठी मनपाच्या माध्यमातून शिवसेनेच्या महापौर सर्वप्रकारचे सहकार्य व आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देतील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 


ADVT - Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar. 
Call 9665762303 For Promote Your Brands / Product in Ahmednagar.

प्रभाग क्र.23 मधील सबजेल चौक परिसारातील कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, सभागृहनेते अनिल शिंदे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, गटनेते दत्ता कावरे,शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम,संभाजी कदम, संतोष गेनप्पा, गणेश तावरे, अशोक दहिफळे, मंगेश तावरे, गणेश म्याना, अर्जुन इप्पलपेल्ली, राजू जाधव, सामल सर, निजामभाई शेख, मुश्ताक शेख, प्रमोद आकुल, गणेश वेदपाठक, महेश उपलंची, डॉ.मंजुषा पळसापुरे, विजया उपलंची, पुरुषोत्तम मोकाटे,संतोष तनपुरे आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना उपनेते अनिल राठोड म्हणाले, गेल्या दीड वर्षापूर्वी शिवसेनेच्या महापौर झाल्यापासून विकास कामांना चालना मिळाली आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत असल्याने जास्तीत जास्ती आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्या निधीच्या माध्यमातून नगरचा विकास करण्यात येत आहे. शिवसेना ही नागरिकांच्या नेहमीच पाठिशी राहिली आहे, त्यांच्या समस्यां सोडविण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढकार घेतला आहे. त्यामुळे पुढील काळातही आमचे नगरसेवक शहराच्या विकासासाठी योगदान देतील. 

याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, या प्रभागाचे नेतृत्व मी स्वत: व विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे असे दोघेही करत असल्याने या प्रभागात जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत. आणखीही कामे प्रास्तावित आहेत, ते पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. यावेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले, प्रभागाच्या विकासात आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण आणत नसून, प्रत्येक भागात आवश्यक त्या ठिकाणी विकास कामांना प्राधान्य देत आहोत. त्यामुळे प्रभागातील अनेक समस्या आपण मार्गी लावल्या आहेत. 

याप्रसंगी दत्ता कावरे, अनिल शिंदे, संभाजी कदम आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश उपलंची यांनी केले तर आभार मंगेश तावरे यांनी मानले. कार्यक्रमास परिसारातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.