श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत डिजीटल सोनोग्रॉफी मशीनचे लोकार्पण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वसामान्यांच्या शाररीक व्याधी दूर करण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे. सेवाभाव रुपाने अल्पदरात दर्जेदार सुविधा गरजू रुग्णांना येथे मिळत असून, सर्व सामाजातील रुग्णांना याचा लाभ होत असल्याची भावना जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.


श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत डिजीटल सोनोग्रॉफी मशीनचे लोकार्पण जिल्हा पोलिस अधिक्षक शर्मा यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, महेश महाराज देशपांडे, प्रकाश मुनोत, सतीश बोथरा, डॉ.प्रकाश कांकरीया, डॉ.वसंत कटारिया, कुंदन कांकरीया, प्रकाश छल्लाणी, सुरेश कटारीया, मानकचंद कटारीया, वसंत चोपडा, दिलीप गुगळे, रेडिओलॉजिस्ट भक्ती फलके, सोनाली सोलट, डॉ.सोपान पानमळकर, प्रशासकीय अधिकारी डॉ.आशिष भंडारी, डॉ.मनोहर पाटील, सतीश लोढा, राजेंद्र पारख आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.वसंत कटारिया म्हणाले की, जिल्ह्यातील पहिले डिजीटल सोनोग्राफी मशीन आनंदऋषीमध्ये उपलब्ध झाले असून, गरजू रुग्णांना अत्यल्पदरात याचा लाभ मिळणार आहे. यासाठी दोन उत्कृष्ट रेडिओलॉजिस्टची सेवा पुर्णवेळ हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. 

लवकरच जागतिक दर्जाचे नेत्र विभाग हॉस्पिटलमध्ये सुरु होणार असल्याचे सांगून, कमी दरात मिळणार्‍या एमआरआय व सिटीस्कॅन सेवेची माहिती त्यांनी दिली. महेश महाराज देशपांडे यांनी वेदनामुक्तीचे यज्ञ आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये चालू असून, याचा लाभ दीनदुबळ्यांना होत आहे. संतांच्या नावाने सुरु असलेल्या हॉस्पिटलद्वारे दवा व दुवा शाररीक व्याधी दूर करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. मन्सूर शेख यांनी हॉस्पिटलच्या समाजोपयोगी उपक्रमास प्रेस क्लबचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याची आशा व्यक्त केली. आभार निखलेंद्र लोढा यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.