सचिन जाधव यांचे खायचे दात वेगळे अन्‌ दाखवायचे वेगळे - उपमहापौर श्रीपाद छिंदम.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी प्रवृत्ती असल्याचा आरोप महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केला आहे. जर, महापालिकेची एवढी काळजी होती तर त्यांनी अनियमिततेचा अवलंब करून स्थायी समितीची सभा बोलविली नसती. त्यांनी स्थायी समितीची सभा रातोरात अजेंडा काढून घाईगडबडीत उरकून घेतली याचे कारण जनतेला चांगले ज्ञात असल्याचाही आरोप छिंदम यांनी केला आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार जिल्हास्तर अमृत अभियानच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तर आढावा व सनियंत्रण समितीच्या सहअध्यक्षपदी संबंधित जिल्ह्यातील संसद सदस्य आहेत. या समितीकडे ही निविदा प्रथमत: पाठविणे आवश्‍यक असताना त्यांना डावलून ही निविदा प्रक्रिया 1520 ही राज्य निविदा समितीकडे पाठविली जात आहे. 

हा अत्यंत चुकीचा पायंडा सभापती यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. सुदर्शन क्‍लिके, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी 28 जून 2017 च्या पत्रानुसार सदरची निविदा महासभेचा ठराव आवश्‍यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.