भंडारदरा धरणाच्या पाण्यात उतरलेला तरुण बेपत्ता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेला तरुण बेपत्ता झाला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुंबई येथील काही तरुण कळसुबाई शिखर सर केल्यानंतर भंडारदरा येथे निसर्गपर्यटन करण्यासाठी आले होते.

ट्रेक केल्यानंतर आलेल्या थकव्यामुळे धरणाच्या पाण्यात हात-पाय धुण्यासाठी संध्याकाळी सातच्या सुमारास उतरले. राजा मनोहरन (वय 27) हा तरुण पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरल्यामुळे तो पाण्यात पडला. उशिरापर्यंत या तरुणाचा शोध लागला नव्हता. अंधार पडल्यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळा आला.

भंडारदरा येथील काही तरुणांनी राजूर पोलिसांच्या मदतीने राजा याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही त्यात यश मिळाले नाही. या तरुणाचा शोध घेण्याची मोहीम रविवारी सकाळी सुरू करण्यात येणार आहे. राजूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भरत जाधव यांच्या मार्गदर्शनात पी. व्ही. थोरात, एस. एस. कदम अधिक तपास करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.