नात्यागोत्यामुळे लय अडचण होते राव,अजित पवारांची जोरदार फटकेबाजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पक्ष संघटनेत चांगले काम करण्यांना संधी देणे आवश्यक आहे. चुका माणसांच्या हातून होतात. मात्र, त्यातून सुधारणा होणे आवश्यक आहे. संघटनेत पदे मिळाल्यावर त्यातून पक्ष वाढीसाठी कार्य व्हावे आणि जनतेचा विश्‍वास संपादन व्हावा. नुसती लेटरपॅडवर आणि पाकिटावर नाव छापण्यासाठी पदांचा वापर होवू नये. पक्ष संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर रिझल्ट देता येत देत येत नसले तर पद सोडा. पुढार्‍यांची पोरं काम करीत नसतील तर त्यांना बाजूला करा. चुकीचे वागणारे, वाळूमाफिया आणि गावावर ओवाळून टाकलेल्यांना राष्ट्रवादीत संधी देवू नका, असा कानमंत्र देत राष्ट्रवादीचे नेत आ. अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांनाही फटकारले
ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign


नगरमधील सहकार सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. मेळाव्या अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड होते. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, जिल्ह्याचे प्रभारी अंकुश काकडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे आ. जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विद्यार्थी राष्ट्रवादी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, युवती आघाडीच्या अध्यक्षा आ. स्मिता पाटील, आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, सभापती कैलास वाकचौरे, उमेश परहर, विठ्ठलराव लंघे, पांडूरंग अंभग यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. 

पवार यांनी पक्ष संघटनेवर चौफर फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीतून ज्येष्ठ नेते पिचड, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, सुजीत झावरे आणि आमदार जगताप परिवार हे देखील सुटले नाही. 

… नगर तालुक्यात राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत अवघी एक जागा मिळाली. यामुळे आ. संग्राम जगताप यांनी तालुक्यात लक्ष घालावे, अशी सुचना पवार यांनी केली. पण तालुक्यात नात्यागोत्यामुळे लय अडचण होते राव, कोणाला काय सांगावे हेच काळत नाही. घोडे कुठे पेंड खाते हे कळत असे पवार म्हणाताच एकच हशा पिकला. 

पारनेर तालुक्यात सुजित झावरे यांना आमदारकी दिली. त्यात ते पडले, मग जिल्हा परिषद दिली. त्यातही पडले. सुजीत झावरे आता स्वभाव बदला. दिलीप वळसे पाटील लक्ष देत नाही, अशी तक्रार झावरे करतात. आता काय वळसे यांनी सुजीतचा फोटो काढून तो पाहत बसावा की काय? असे म्हणताच हशात आणखीन भर पडली. 

त्याच पारनेरमध्ये दादा कळमकर यांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालवे. मात्र, काही झाले तरी आता कळमकर यांना पारनेर मतदारसंघातून विधान सभेचे तिकीट मिळणार नाही. मोठ्या पवार साहेबांनी सांगितले तरी ते अशक्य असल्याचे पवार म्हणताच सभागृह हास्यात बुडाले.

राज्यातील किती लोकांना कर्जमाफीचा फायदा होणार हे सांगण्यास सरकार तयार नाही. ही कर्जमाफी आहे की कर्जवसूली आहे हे कळण्यास तयार नाही. 8 लाखांचे कर्ज असले तर अधी रोखीने साडे सहा लाख भरा आणि पावती दाखवा. मग सरकार दीड लाख रुपयांची कर्जमाफी देणार हा प्रकार कर्जमाफी नव्हे कर्ज वसूलीचा असल्याची टीका पवार यांनी केली. हे सरकार आणि त्यातील मंत्री खडी का खुळी हे कळेणाच असे पवार म्हणताच पुन्हा हश्या पिकला. 

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.