श्रीगोंद्यात दोन गटांत तुफान हाणामारी व दगडफेक .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील श्रीगोंदा पेडगाव रस्त्यावरील सिद्धेशवर चौकात सोमवारी (दि.१०) विशिष्ट समाज्याच्या दोन गटात वाद झाले. हे वाद विकोपाला गेल्याने त्याचे पर्यावसन तुफान हाणामारी व दगडफेकीत झाले. ऐनवर्दळीच्या रस्त्यावरच दगडफकीच्या घटनेमुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्यांसह या परिसरातील रहिवाशांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती.



या घटनेची अधिक माहिती अशी की, सोमवारी या समाजातील एकाचा या परिसरातील मंगल कार्यालयात विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त समाजातील मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर यातील काही महिला व पुरुषांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाल.मात्र या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या समाजातील दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने तुफान दगडफेक केली.

या दगडफेकीत त्यांच्यातीलच एकाचे डोके फुटून तो रक्तबंबाळ झाला. तरीदेखील त्यांच्यातील वाद मिटत नव्हता. त्यातच आज सोमवार श्रीगोंद्याचा आठवडेबाजार असल्यामुळे या चौकात नागरिकांची मोठी वर्दळ होती. तसेच शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांची देखील मोठी ये-जा सुरु होती. अशातच अचानक दगडफेक झाल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्या परिसरातील रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रचंड धावपळ झाल्याने एकच गोंधळ उडाला.

त्याचवेळी प्रसंगावधान राखत विलास रसाळ, इरफान पिरजादे व सकुर शेख या तरुणांनी या वादात हस्तक्षेप करून वाद घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे चहा घेत असलेला एक पोलिस कर्माचारी देखील या तरूणांच्या मदतीला येत, या सर्वांनी मिळून या भांडणे करणाऱ्या दोन्ही गटांना शांत केले. या घटनेची खबर मिळताच श्रीगोंदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला नेले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Social Media Marketing & Brand Promotion Solutions in Ahmednagar.
https://tinyurl.com/nagarsocialmedia


ADVT - Website Designing & Devolopment Services in Ahmednagar
https://tinyurl.com/nagarwebdesign

Bulk SMS & Voice Calls Marketing In Ahmednagar
https://tinyurl.com/nagarbulksms
Blogger द्वारा समर्थित.