कोपरगाव - बलात्काराच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोबाईलवर चित्रीकरण करून बदनामी करण्याची धमकी देऊन पती बाहेर गेल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पिडीत विवाहितेने तीन आरोपीविरूद्ध कोपरगाव पोलिसांत दिली होती. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश रघुवंशी यांनी गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्‍तता केली आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

याबाबत माहिती अशी की, सन २०१५ साली शहरातील गजानननगर भागातील विकास मच्छिंद्र एरंडे, महेंद्र हिरालाल पाटील, राहुल रमेश आमले यांनी २० वर्षीय विवाहितेचे मोबाईलवर चित्रीकरण करून महिलेची संमती नसतांना लैंगिक अत्याचार केला म्हणून आरोपींविरोधात कोपरगाव पोलिसांत भादंवि कलम ३७६ (१), ५०४ व ३४ व अनुसूचित जाती जामाती कलम ३ (१) (१२) अन्वये गुन्हा रजि. नं. ८८/ २०१५ गुन्हा दाखल केला होता.

येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपत्र दाखल करण्यात येऊन सुनावणी झाली. सरकारतर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपी यांच्या वतीने ॲड. योगेश खालकर यांनी सदर खटला बनावट असून केवळ पैशाच्या वैमन्यास्यातून खोटा गुन्हा दाखल केला होत. 

तसेच बलात्काराची कुठलीही घटना घडलेली नाही, असे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देवून सदरचा खटला हा तपासी अंमलदाराने कुठलाही तपास न करता दाखल केला आहे. हा ॲड. योगेश खालकर यांचा व्युक्‍तीवाद न्यायालयाने मान्य करून जिल्हा व सत्र न्यायधीश रघुवंशी यांनी आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्‍तता केली.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.