नगर - जामखेड रोडवर जीपच्या धडकेत एक जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रिक्षाची वाट पाहणाऱ्या प्रवाशाचा भरधाव जीपने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. नगर – जामखेड रस्त्यावरील पोखरी फाटा बसथांब्यावर रविवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जीपचा चालक पसार झाला. 


जामखेडपासून सात कि .मी. अंतरावरील पोखरी फाटा येथील बस थांब्यावर येथील अप्पा मारुती खांडवे (वय 46) जामखेड येथे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभे होते.सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नगरकडून जामखेडकडे भरधाव निघालेल्या क्रुझर जीपने त्यांना जोराची धडक दिली. 

या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर जीपचालक जामखेड येथेजीप सोडून पसार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले. रविवारी रात्री येथील ग्रामीण रुग्णालयात खांडवे यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.