अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरूणाचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या मदतीने खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. ५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील पढेगाव येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स्वत:हून पोलिसांत हजर झाला, तर पत्नी घटनेनंतर माहेरी निघून गेल्याचे समजते.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विकास इंद्रभान पवार (वय ३५, रा. पढेगाव) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल प्रदिप तोरणे (वय ३२) व मनिषा विकास पवार (दोघेही रा. पढेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी : विकास याची पत्नी मनिषा हिच्याबरोबर विशाल याचे अनैतिक संबंध होते. मध्यंतरी विकास हा पत्नीला घेऊन आपल्या सासूरवाडी देवगाव (ता. नेवासा) येते रहाण्यासाठी गेला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
याठिकाणी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी (दि. ४) शकुबाबाचा यात्रौत्सव असल्याने तो पढेगावाला आला होता. रात्री साडेदहा वाजेच्यासुमारास दारू पिल्यानंतर तो विशाल याच्या घरी गेला. याठिकाणी दोघांमध्ये मनिषावरून वाद झाले. त्यातून विशाल याने त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने परिसरातील नागरिकही बाहेर आले नाही. त्यामुळे सकाळी या घटनेचा उलगडा झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.