हत्येच्या निषेधार्थ केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव पोटनिवडणूक निकालानंतर शनिवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगतापसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अहमदनगरमध्ये केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शिवसैनिकांनी पाथर्डीत रास्ता रोको करण्यास सुरूवात केली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आज दुपारी अहमदनगरमध्ये येणार आहेत. अन्य भागात बंद असला तरी कर्जत व नेवासे तालुक्यात मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. नेवाशात रविवारी आठवडा बाजार असल्याने सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जतला मंगळवारी बंद पाळण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.