केडगाव हत्याकांड : अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगाव येथील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत ठुबे यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे दोन व भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांसह 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या हत्याकांडामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हा बंदीची हाक देण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्‍यातील शिवसेनेच्या शाखांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाभर तणावसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
केडगाव शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी श्रीगोंद्यात कडकडीत बंद; चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदनगरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डी दौरा रद्द झाला आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये पोहोचले असून . पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.