आ.अरुण जगताप व आ.शिवाजी कर्डीले यांच्या अटकेची शक्यता​​

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
 या प्रकरणात तीन आमदारांसह एकूण ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले असून भानुदास कोतकर आणि बाळासाहेब कोतकर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 



आ. संग्राम जगताप त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काँग्रेसचा संदीप गुंजाळ हा पोलिसांना शरण आला असून त्याच्याकडून पिस्तूल आणि गुप्ती हस्तगत करण्यात आली आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
शिवसेना नेते रामदास कदम आणि दिवाकर रावते नगरला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शिर्डी दौरा रद्द केला आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.